बेटी बचाओ, बेटी पढाओ | बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार | पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत | झाडे लावू या, झाडे जगवू या | पाणी अडवा, पाणी जिरवा | वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | स्वच्छ भारत, स्वस्थ भारत | एक पेड, एक जिंदगी |
आश्रमशाळा पिंपळे या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

उपक्रम (सांस्कृतिक):



दिनांक ०९/१०/२०१९
अनुदानित आश्रमशाळा पिंपळे बु. येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन :


          आज दिनांक ०९/१०/२०१९ वार बुधवार रोजी, सु अ पाटील प्राथमिक,यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता. अमळनेर जि. जळगाव येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्ररीत अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव तर्फे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटोला फुलहार घालून दीपप्रज्वलन करुन मंगलमय वातावरणात उदघाटन करण्यात आले यावेळी अमळनेर केंद्रातील सेवेकरी श्री रवींद्र पाटील, गणेश कुवर, सौ. सुंदताई, सौ. वैशालीताई, सौ. वंदनाताई पाटील तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश अहिरे सर, श्री उदय पाटील सर, सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, सुरवातीला टाळ्यांच्या गजरात सेवेकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले नंतर श्री आर. जी. सोनवणे सरांनी सेवेकऱ्यांचा परिचय करून शाळेतर्फे नारळ गुलाब पूष्प देऊन सत्कार केला नंतर श्री अहिरे सरांनी प्रस्ताविकातून आमच्या शाळेचे आधार स्तंभ शैक्षणिक सल्लागार नानासाहेब श्री युवराज दगाजीराव पाटील साहेब व संस्थेच्या अध्यक्षा ताईसो सौ. विद्याताई युवराज पाटील यांची इच्छा होती की, आपल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावे यासाठी श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र चालवावे ते आज आपण सर्वांच्या साक्षीने सुरु करत आहोत. श्री रवींद्र पाटील व सेवेकर्यांनी अध्यात्मावर मुलांना अनमोल असे मार्गदर्शन केले. सौ. सुंदताई, सौ. वैशालीताई यांनी बालसंस्कारची नियमावली व महत्व सांगितले श्री गणेश भाऊंनी मार्गदर्शन केले तसेच सौ वंदनाताई पाटील यांनी आध्यात्म आणि बालसंस्कार याचे आपल्या जीवनातील आवशक्यता त्याचे होणारे फायदे यावर प्रकाश टाकून मुलांना मंत्रमुग्ध केले हितेश पवार सरांनी आभारप्रदर्शन केले सदर कार्यक्रम आपल्या शाळेतील सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या उपस्तीत व सहकार्याने यशस्वी झाला.

*  *  *

दिनांक : ०२/०९/२०१९
पिंपळे आश्रमशाळेत पर्यावरण पुरक श्रीगणेशाची उत्साहात स्थापना :


          दि. 2 सप्टेंबर 2019 वार सोमवार रोजी सालाबादप्रमाणे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून, चिंतामणी गणेश मंडळाच्या वतीने श्रीगणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली, मात्र यावेळी गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, जलप्रदूषण आणि ध्वनि प्रदूषण व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम बघता पर्यावरणवादी दृष्टीकोन ठेऊन आश्रमशाळेतील उच्च माध्यमिक शिक्षक श्री. हेमंत पाटील यांनी पर्यावरण पूरक गणेश स्थापनेचा मानस व्यक्त केला, त्यांच्या या कल्पनेला शाळेतील मुख्याध्यापक श्री उदय पाटील व अविनाश अहिरे यांनी दुजोरा दिला, श्री हेमंत पाटील यांनी शाळूच्या मातीपासून तयार केलेली गणेशाच्या मूर्ती स्वखर्चाने शाळेला स्थापना करण्यासाठी दिली, गणेशोत्सवाचे निमित्ताने त्यांनी शाळेला दोन शोभेची झाडेही भेट दिली सदर कार्यक्रमास प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याद्यापक श्री.अविनाश अहिरे व माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याद्यापक श्री. उदय पाटील, श्री सागर पाटील, श्री स्वप्नील पाटील, हीतेश पवार, अंबालाल पाटील, रोहित नेरकर, गंगासागर वानखेडे, आशिष निकम, दीपक नांद्रे, चेतन पाटील, अविनाश पाटील, सी.ए. पाटील, उदय भाऊसाहेब, हे उपस्थित होते, श्रीगणेशाची स्थापनेसाठी पर्यावरणपूरक आरास तयार करण्याचे काम शाळेतील वर्ग चार कर्मचारी रवींद्र पाटील, सतीश पवार, भुषण पाटील, सुनील भोई, अंकुश भिल, विनोद पाटील, यांनी केले.
          संस्थेचे मा. अध्यक्षा सौ. विद्या युवराज पाटील, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार मा. श्री. युवराज पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे अनमोल सहकार्य लाभले.

*  *  *

दिनांक : २४/०८/२०१९
पिंपळे आश्रम शाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा :



          अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रमशाळेत गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामागे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत, यासारख्या ग्रंथांची ओळख व्हावी त्यातून काहीतरी बोध मिळावा, म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन आश्रम शाळेत नेहमीच केले जात असते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र राहणे, एकमेकांची काळजी घेणे, कोणताही भेदभाव न करणे, अशा गुणांची जोपासना व्हावी असा उद्देश असतो. त्यामुळे असे कार्यक्रम नेहमीच घेतले जात असतात. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती माधुरी पाटील, नितीन सोनवणे, मुकेश पवार, राहुल पाटील, दीपक नांद्रे, संजू पवार, आशिष निकम, आदींनी परिश्रम घेतले, विद्यार्थ्यांना बाल श्रीकृष्ण राधा असे वेष परिधान केले होते, विद्यार्थ्यांनी आळीपाळीने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला शेवटी तीन थरांची बालगोपाळांची दहीहंडी फोडण्यात बालगोपाळ यांना यश आले.
          दहीहंडी उत्सवाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री उदय पाटील व श्री अविनाश अहिरे यांनी दहीहंडीचे पूजन केले व नंतर अत्यंत उत्साहात दहीहंडीचा उत्सव आश्रम शाळेत रंगला, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण होते. असे कार्यक्रम सण-उत्सव साजरे करण्याची प्रेरणा आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्षा माईसाहेब विद्याताई पाटील व मार्गदर्शक नानासाहेब युवराज पाटील त्यांच्यापासून मिळत असते असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment