बेटी बचाओ, बेटी पढाओ | बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार | पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत | झाडे लावू या, झाडे जगवू या | पाणी अडवा, पाणी जिरवा | वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | स्वच्छ भारत, स्वस्थ भारत | एक पेड, एक जिंदगी |
आश्रमशाळा पिंपळे या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

उपक्रम (प्रशिक्षण व मार्गदर्शन) :


दिनांक २४/१२/२०१९
युवा प्रेरणा मेळावा

          साने गुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठान अमळनेर व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता. अमळनेर जि. जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी जयंती निमित्ताने दि. २२/१२/२०१९ ते दि. २४/१२/२०१९ असा युवा प्रेरणा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे शैक्षणिक मार्गदर्शक मा. युवराज पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले साने गुरुजींनी लिहिलेले "श्यामची आई" हे पुस्तक खुप वर्षापुर्वी मनी ऑर्डर करुन पोस्टाने मागवून वाचले त्या वाचणामुळे मला वाचणाची प्रेरणा मिळाली, या प्रेरणेतून खुप वर्षापुर्वी गावात वाचनालय सुरु केले हा वारसा आपल्या सर्वांना जपायचा आहे वाढवायचा आहे. संस्थेचे सचिव ताईसाो, रेखाताई पाटील, दिलीप साहेबराव पाटील, विनायक साळवे, मुख्याध्यापक उदय पाटील, अविनाश अहिरे, प्राचार्य सुनिल पाटील, पायल पाटील, दर्शना पवार, चेतन भोई, प्रथमेश कोठावदे, किशोर महाजन विचारमंचावर उपस्थित होते.


          मेळाव्याच्या उद्घाटन समारंभानंतर आश्रमशाळेतील इंग्रजी विषय शिक्षकांनी तयार केलेल्या इंग्रजी विषयाचे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य लॅबचे उद्घाटन पायल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तद्नंतर मेळाव्यात मा. विनायक साळवे यांनी विवेकी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मुलांशी संवाद साधला. जिद्द, प्रामाणिकपणा हे गुण जीवनात यशस्वी व्हायला मदत करतात. हा संदेश हसत खेळत, नाटक, गप्पा-गोष्टी द्वारा विनायक साळवे सरांनी दिला. मेळाव्याच्या दुसरे सत्रात प्रा. शेखर सोनाळकर सरांनी “गांधींच्या - गोष्टी” हे मुलांशी गप्पा करीत छान घेतले. यात स्वातंत्र, पारतंत्र म्हणजे काय? महात्मा गांधींनी लहान-लहान गोष्टीतुन आपल्याला कशी प्रेरणा दिली हे विद्यार्थ्यांशी गप्पा करुन समजवून सांगितले. मेळाव्याच्या तिसरे सत्रात डॉ. रविंद्र टोणगांवकर यांनी बदलत्या वयातील जाण आणि भान या विषयावर घेतले. शरीर, आरोग्य, होणारे बदल, कसे समजवून घ्यावयाचे हे मुलांना हसत खेळत समजवून सांगितले. मेळाव्याच्या चौथे सत्रात सुरेश बोरसे सरांनी “गोष्टी विज्ञानाच्या - चमत्कार नाकारण्याच्या” या विषयावर मुलांना प्रात्याक्षिकांच्या माध्यमातुन मनोरंजनासह समजवून सांगितले. 
          युवा प्रेरणा मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी गटचर्चा करुन सर्व युवा-युवतींचे सात-आठ गट तयार करण्यात आले. सामाजिक विषयावर सर्वांनी मोकळी चर्चा केली व टिप्पणे तयार करुन आपली मते मांडली. दुसरे सत्रात कौशल्य विकासाचे सत्र शहादा येथील भारती पवार व धारिणी पाटील यांनी घेतले. पोस्टर, रांगोळी, टाकाऊ पासून टिकाऊ, केश हे सारे शिकवून सराव करुन घेण्यात त्या यशस्वी झाल्यात. तिसरे सत्रात चोपडा येथील गौरव महाले सरांनी गणितातील गमती जमती घेऊन गणित विषयाची भिती विद्यार्थ्यांच्या मनातुन काढली. नंतर माजी प्राचार्य सराफ सर यांनी जीवनातील हसण्याचे महत्व या विषयी माहिती देऊन साने गुरुजी लिखीत तीन मुले ही गोष्ट सांगितली. 
          युवा प्रेरणा मेळाव्याच्या तीसऱ्या दिवशी समारोपाच्या प्रसंगी मा. श्री अविनाश पाटील राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समिती यांनी व्यसनांचे दुष्परीणाम या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्राध्यापक परेश शहा शिंदखेडा यांनी साने गुरुजींचे जीवन चरित्र अतिशय मार्मिक पध्दतीने सांगितले. युवा प्रेरणा मेळाव्याच्या शेवटी विशाल बोरसे, निलेश पावरा, कमला पावरा, सविता पावरा या विद्यार्थ्यांनी व श्री हेमंत पाटील, श्री गंगासागर वानखेडे, श्री योगेश भामरे यांनी मेळाव्या विषयी मत मांडले तसेच प्रास्ताविक साने गुरुजी कर्मभुमी स्मारकाच्या कार्यवाह दर्शना पवार, सुत्र संचालन सतिष कागणे, माधुरी पाटील तर आभार प्रदर्शन श्री उदय पाटील व श्री अविनाश अहिरे यांनी केले.

* * *

दिनांक २/१२/२०१९
" रानपाखरांना बळ देण्यासाठी सरसावले - चार PSI "

प. पु. साने गुरुजी वाचनालय व मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा 
आयोजक:-केंद्र संचालक मा.श्री विजयसिंग पवार



          यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक ता. अमळनेर जि. जळगाव या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धा परीक्षांच्या व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं होतं. आमच्या आश्रम शाळेतील प्रतिभावंत शिक्षक श्री. कांगणे सर यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी नुकत्याच झालेल्या MPSC पूर्व परीक्षेतून PSI पदासाठी निवड झालेले. आदरणीय श्री.विशाल देवरे (रा. सुरपान ता. साक्री) श्री. संदीप भोई (रा. अमळनेर) श्री. बागुल साहेब (रा. खडकी ता. मालेगाव) श्री. गोकुळ पाटील (रा. फैजपुर ता. रावेर) यांचे मार्गदर्शन मिळाले. आपल्या अफाट कष्टातून, जिद्द व चिकाटी तून यशाची शिदोरी आपल्याकडे खेचून आणली. माणसाची परिस्थिती कितीही गरिबीची असली परंतु, त्याच्याकडे कष्ट करण्याची ताकद काहीतरी करण्याची धम्मक असेल तर तो जीवनात यशस्वी होऊ शकतो. हे ब्रीद वाक्य ह्या चारही तरुण अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवातून/ मनोगतातून स्पष्ट केले. लहरो से डरकर नौका, कभी पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती. सदर कार्यक्रमाला प्राथ. व माध्य. मुख्याध्यापक श्री. अहिरे सर व श्री. उदय पाटील सर तसेच श्री. प्रवीण पाटील, श्री. डी. डी. नांद्रे, श्री. बी. बी. वानखेडे, श्री. हेमंत पाटील, श्री. एस. एल. पाटील, श्री. स्वप्नील पाटील, श्री. सागर पाटील, श्री. चेतन पाटील, श्री. हितेश पवार, श्री. आशिष निकम शिक्षकवृंद उपस्थित होते. श्री चिंतामणी महिला एज्युकेशन संकुलाच्या अध्यक्षा माईसो. सौ. विद्याताई युवराज पाटील, शैक्षणिक सल्लागार मा. श्री. नानासाहेब युवराज दगाजीराव पाटील व पदाधिका-यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांगणे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. उदय पाटील सर यांनी केले. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सदरहू कार्यक्रमाचे योगदान महत्त्वाचे राहील.

* * *

दिनांक : २१/०८/२०१९
स्वच्छता व आरोग्य

उपक्रमाचे नाव : स्वच्छता व आरोग्य.

उपक्रमाची यादी : १) हात धुवा प्रात्यक्षिक, २) स्वच्छता व आरोग्यविषयक मुकाभिनय, ३) परिसर स्वच्छता, ४) कृतीयुक्त गीताद्वारे मानवी शरीराची ओळख.

स्थळ : यशवंत माध्य. व उच्च माध्य. आदिवासी आश्रमशाळा, पिंपळे बु., ता. अमळनेर, जि. जळगाव.

उपक्रमाचे आयोजक : श्री भटू बळीराम वानखेडे.

          यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे चालू शैक्षणिक वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आपण मोठे होत आहोत. ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांचे संस्कार रुजविले जातात त्याचबरोबर आरोग्य व स्वच्छता या बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात आपले निरोगी जीवन जगण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता स्वच्छता व परिसर स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते याची माहिती आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिक कृतीद्वारे कृतीयुक्त गीताद्वारे, मूक अभिनयाद्वारे देण्यात आली सदा रहो उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला . सदर हो उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागाने वर्गात व वर्गाच्या बाहेर घेण्यात आले व त्यांचे सादरीकरण करण्यात आले. तर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले कुमार अवस्थेतील मुला-मुलींना त्यांच्या विविध बदलाविषयी माहिती सांगण्यात आली.

हात धुवा चे प्रात्यक्षिक सादरीकरण



आरोग्य व स्वच्छता या विषयावर मुकाभिनय सादरीकरण



हात धुण्याची शास्त्रीय पद्धत



मानवी शरीराची ओळख याची प्रतिकृती




* * *

दिनांक : 07/08/2019

विविध कृतीयुक्त गीत, खेळ, मुकाभिनय यांचे सादरीकरण


उपक्रमाचे नाव : विविध कृतीयुक्त गीत, खेळ, मुकाभिनय यांचे सादरीकरण.

स्थळ : यशवंत माध्य. व उच्च माध्य. आदिवासी आश्रमशाळा, पिंपळे बु., ता. अमळनेर, जि. जळगाव.

उपक्रमाची यादी : १) सहा सोबती (कृतीयुक्त गीत) , २) अपनी दोस्ती कितनी अच्छी (कृतीयुक्त गीत).  ३) मी आहे जादू वाला मुलांनो (कृतीयुक्त गीत), ४) फुगे फोडणे (कृतीयुक्त खेळ)

आयोजक : श्री प्रवीण रामेश्वर पाटील. 

          "आम्ही मोठे होत आहोत "ह्या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद व आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या संयुक्त माध्यमातून करण्यात आलेले होते. सदरहू प्रशिक्षणामध्ये आश्रम शाळेतील कुमार अवस्थेतील मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल ,भावनिक बदल, सामाजिक बदल ,अशा विविध पैलू विषयी मार्गदर्शन करण्यात आले. व आश्रम शाळेतील विद्यार्थी हे मोठे होत आहेत. त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारे विविध प्रश्न, मुले व मुली यांच्या विविध लैंगिक समस्या, स्वच्छता व आरोग्याची काळजी घेणे. अश्या विविध बाबतीत यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा ,पिंपळे बुद्रुक येथे कृतीयुक्त गीत, कृतीयुक्त खेळ यांच्या माध्यमातून वर्गात तसेच वर्गाच्या बाहेर विविध उपक्रम घेण्यात आले व त्याचे सादरीकरण करण्यात आले. सदरहू उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण तयार करणे, आपले शरीराचे विविध अवयव याविषयी माहिती सांगणे व त्यांचा आदर करणे, तसेच आपल्या शरीरातील अवयवांचे महत्त्व जाणून घेणे, स्त्री-पुरुष समानता अशा विविध पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये आपण मोठे होत आहोत. आपण देशाचे भावी नागरिक आहोत. म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासावी, व्यसनापासून लांब रहावे, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी घ्यावी, परिसर स्वच्छ ठेवावा. असे विविध संदेश सदरहू कृतीयुक्त गीता मार्फत व खेळा मार्फत आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात आले.


फुगे फोडणे( कृतीयुक्त खेळ) सदरहू खेळाद्वारे आश्रमशाळेतील मुले व मुली
यांच्यामध्ये मैत्री युक्त वातावरण निर्माण करण्यात आले.



सहा सोबती (कृतीयुक्त गीत) सदरहू कृतीयुक्त गीतामध्ये आदिवासी मुला-मुलींनी कृतीयुक्त सहभाग
घेतला व आपल्या मनामध्ये निर्माण होणारे विविध प्रश्न, कसे? कोणते? केव्हा? काय? कधी? किती?
यांचे गीताच्या माध्यमातून कृतीयुक्त सादरीकरण केलं.



अपनी दोस्ती कितनी अच्छी कृतीयुक्त गीत सदरहू  कृतीयुक्त गीत आश्रम शाळेतील मुलं व मुली यांनी
सादर केले .सदर गीताद्वारे आपल्या शरीरातील अवयवांची माहिती कृतीयुक्त गीताद्वारे सादर करण्यात आली.

































No comments:

Post a Comment