बेटी बचाओ, बेटी पढाओ | बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार | पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत | झाडे लावू या, झाडे जगवू या | पाणी अडवा, पाणी जिरवा | वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | स्वच्छ भारत, स्वस्थ भारत | एक पेड, एक जिंदगी |
आश्रमशाळा पिंपळे या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

संस्थेचे नाव : श्री चिंतामणी महिला एजुकेशन सोसायटी

पत्ता : मु. पो. पिंपळे बु., ता. अमळनेर, जि. जळगाव - ४२५४०१.

 

संस्थेचा इतिहास :

                माळण नदी काठी वसलेल्या पिंपळे या गावी विद्येची देवता असलेल्या श्री गणेशाच्या नावाने आमच्या श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना पिंपळे बु.ll ता.अमळनेर जि.जळगाव येथे करण्यात आली. संस्थेची नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणी केलेली असुन तिचा नोंदणी क्रमांक महा/3682/जळगाव दिनांक 1 ऑक्टोबर 1996 अन्वये करण्यात आलेली आहे. तसेच संस्थेची नोंदणी मुंबई विध्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 अन्वये केलेली असून तिचा नोंदणी क्रमांक एफ/3600/जळगाव दिनांक 07/07/1997 असा आहे.

                "असाध्य ते साध्य करिता सयास" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेचे प्रेरणास्थान आदरणीय दादासाहेब आनंदा पाटील यांच्या आशिर्वादाने संस्थेचे बिजारोपण झाले आणि अल्पावधीतच संस्थेने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये दैदिप्यमान अशी उंच भरारी घेतलेली आहे.

                संस्थेच्या अध्यक्षा माईसो. विद्याताई पाटील आणि शैक्षणिक सल्लागार नानासो. युवराज पाटील साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे संस्थेच्या खालील शाखा गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देत आहे. शिक्षणापासून वंचित आहे, अशा आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आदि. आश्रमशाळा सुरु केलेली आहे.

 

संस्थेच्या शाखा खालील प्रमाणे :

          1) राजे शिवाजी विद्यालय, नंदुरबार जि.नंदुरबार

          2) विद्यासागर पब्लिक स्कूल, नंदुरबार, जि.नंदुरबार

          3) सु. अ. पाटील आदि. आश्रमशाळा पिंपळे बु.ll ता.अमळनेर जि.जळगाव

          4) यशवंत माध्य. व उच्च माध्य. आदि. आश्रमशाळा पिंपळे बु.ll ता.अमळनेर जि.जळगाव

          5) युवाकल्याण अध्यापक विद्यालय, पिंपळे बु.ll ता.अमळनेर जि.जळगाव

          6) ब्लॉसम इंटरनॅशनल स्कुल, नंदुरबार, जि.नंदुरबार

          7) ब्लॉसम इंटरनॅशनल स्कुल, पिंपळे बु.ll ता.अमळनेर जि.जळगाव

 

संस्थेचीकार्ये :

                श्री चितामणी महिमा एज्युकेशन सोसायटी या संस्थेने शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्येही उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

          1) रक्तदान शिबीर

          2) पर्यावरण जागृती मोहीम - वृक्ष लागवड, संवर्धन, वृक्ष दिंडी

          3) व्यसनमुक्ती अभियान

          4) योग प्रशिक्षण कार्यक्रम

          5) महिला विषयक कार्य - हुंडाबंदी, बालविवाह, प्रतिबंध, बालमेळावे, अंधश्रद्धा निर्मुलन

          6) कृषी विषयक कार्यक्रम - शेतकरी मेळावा

          7) समाज सेवा शिबीर

          8) सांस्कृतिक कार्यक्रम व विविध गुण दर्शन सोहळा

          9) आदिवासी पालक मेळावा

        10) आदिवासी सण उत्सव साजरी करणे

 

                संस्थेने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्येही भरीव कामगिरी केली. सदर कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि सन 2006 सालचा ''आदिवासी सेवा संस्था पुरस्कार'' संस्थेच्या अध्यक्षा ताईसो. विद्याताई पाटील समवेत आदरणीय दादासो. साहेबराव आनंदा पाटील व ताईसो रेखाताई अशोकराव पाटील यांना देण्यात आला. सदर पुरस्कार मा. उप मुख्यमंत्री श्री. आर. आर. पाटील, मा. आदिवासी विकास मंत्री श्री. विजयकुमारजी गावित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष :

                श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संस्थेला 1 ऑक्टोबर - 2021 रोजी 25 वर्षे पूर्ण झाली.



No comments:

Post a Comment