बेटी बचाओ, बेटी पढाओ | बेटी है कुदरत का उपहार, मत करो इसका तिरस्कार | पढेगा लीखेगा भारत, तो आगे बढेगा भारत | झाडे लावू या, झाडे जगवू या | पाणी अडवा, पाणी जिरवा | वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान | स्वच्छ भारत, स्वस्थ भारत | एक पेड, एक जिंदगी |
आश्रमशाळा पिंपळे या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

उपक्रम (सहशालेय):




दिनांक : १३/०८/२०१९
पिंपळे आश्रम शाळेत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी :


अनुदानित प्राथमिक माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बुद्रुक येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश अहिरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक श्री उदय पाटील सर होते. मान्यवरांच्या हस्ते हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले, तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी युद्धनीती विषयी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, श्री उदय पाटील यांनी अहिल्यादेवींच्या कार्यकाळ व त्यांच्यावर एकामागून एक आलेली संकटे आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर श्री अविनाश अहिरे यांनी अहिल्यादेवींच्या बालपणाविषयी व धर्मिक कार्याविषयी माहिती सांगितली. सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच श्री रवींद्र धनगर यांनी सूत्रसंचालन व श्री गंगासागर वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले.

* * *

दिनांक : ३१/०७/२०१९
पक्षी विज्ञान कार्यशाळा :



उपक्रमाचे नाव : पक्षी विज्ञान कार्यशाळा.

स्थळ : यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, पिंपळे बु., ता. अमळनेर, जि. जळगाव. 

प्रमुख वक्ता : श्री अश्विन पाटील सर, पक्षीमित्र

प्रमुख पाहुणे : श्री अविनाश अहिरे प्राथ. मुख्याध्यापक, श्री उदय पाटील माध्य. मुख्याध्यापक, श्री सुनील वाघमोडे.

उपक्रमाचे आयोजक : श्री प्रवीण रामेश्वर पाटील, श्री बी. बी. वानखेडे, श्री हितेश पवार, श्री अविनाश पाटील.

          दिनांक 31 जुलै 2019 रोजी यशवंत माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु. ता. अमळनेर येथे पक्षी विज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, श्री अश्विन पाटील, पक्षीमित्र हे होते. व कार्यक्रमासाठी प्राथ. मुख्याध्यापक श्री अहिरे सर, माध्य. मुख्याध्यापक, श्री उदय पाटील सर हजर होते. सदरहू कार्यक्रमाचे नियोजन विविध उपक्रम समितीमार्फत करण्यात आलेले होते. श्री अश्विन पाटील पक्षीमित्र यांनी व्हिडिओ प्रोजेक्टर चा वापर करून विविध पक्ष्यांच्या जाती, त्यांचे स्थलांतर, पक्ष्यांचे संवाद व पक्ष्यांचे निसर्गाच्या सौंदर्यातील महत्त्व, पक्ष्यांचे विज्ञान याविषयी सखोल माहिती आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना सांगितली. सदरहू कार्यक्रम सुरू असताना आश्रम शाळेचे विद्यार्थी रंगून गेले होते. आजच्या आधुनिक युगात पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यासोबत पक्ष्यांचे जीवन हे सुद्धा धोक्यात आलेले आहे. कारण इंटरनेटचा वापर, मोबाईल फोनचा वापर याच्यामुळे पक्षी मृत्यूचे प्रमाण वाढलेलं आहे. पर्यावरणातील प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण ह्या मानव निर्मित संकटाला पायबंद करण्यासाठी सदर कार्यक्रमाद्वारे संदेश दिला व " पर्यावरण वाचले तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तर माणूस वाचेल " असा संदेश सदरहू उपक्रमा मार्फत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आला.

* * *

दिनांक : २४/०७/२०१९
पिंपळे आश्रमशाळेत विद्यार्थी सन्मान योजनेचा शुभारंभ :



          सु. अ. पाटील प्राथ. व यशवंत माध्य. व उच्च माध्य. अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु। ता.अमळनेर जि.जळगाव येथे विद्यार्थी सन्मान योजनेचा शुभारंभ संस्थेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई पाटील, शैक्षणिक मार्गदर्शक नानासो. युवराज पाटील माध्य.मुख्याध्यापक,प्राथ.मुख्या. व शिक्षक यांच्या संकल्पनेतुन झाला. या योजनेअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थींच्या प्रामाणिक पणाला खऱ्या अर्थाने उत्तेजन देण्यात येणार आहे. या योजनेत ज्या विद्यार्थ्यांना शालेय परिसरात, रस्त्याने काही वस्तु, घड्याळ, पाकीट, पैसे, शाळेची काही वस्तू ताट, चादर किंवा इतर साहित्य सापडल्यास ती वस्तू अथवा साहित्य कार्यालयात किंवा शिक्षकांकडे जमा केल्यास, तसेच शालेय परिसर स्वच्छता राखणे, लहान मुलांची काळजी घेणे, आजारी मुलांना गोळ्या औषधीसाठी शिक्षकांजवळ आणणे, असे गुणी विद्यार्थी आहेत त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो, खर्‍या अर्थाने हा त्या विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणाचा सन्मान केला जातो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
          खरे पाहता यातुन इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते व उक्रमातुन या देशात प्रामाणिक नागरिक घडण्यास मदत होईल असा मानस प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अविनाश अहिरे व माध्यमिक मुख्याध्यापक श्री. उदय पाटील यांनी व्यक्त केला आहे, या योजनेच्या यशस्वीतेसाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहु असा विश्वास शिक्षकांनी मुख्याध्यापक यांना दिला.







No comments:

Post a Comment